ब्रेकिंगमहाराष्ट्र

पहिली ते नववी व अकरावी वर्गाच्या परीक्षा आयोजन व निकाल पुढे ढकलावाप्रा एन.डी.बिरनाळे.

कोल्हापूर:संजय पाटील

राज्यभर पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे. हा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर इ. १२ वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे.. त्याचा निर्णय तातडीने करणे आवश्यक आहे.

पहिली ते नववी वअकरावीच्या परीक्षा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तूर्त घेणे अशक्य असल्याचे स्पष्ट होत आहे .. अनेक शाळांमधून शिक्षक व विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरोना संसर्ग तीव्रता कमी झालीच तर बोर्डाच्या नियोजनानुसार २३ एप्रिल २०२१ पासून बारावी लेखी परीक्षा सुरू होतील.. संपूर्ण लेखी परीक्षा व मूल्यमापन कामकाज काळात अकरावी परीक्षा घेणे उचित नाही.. शिक्षकांना एकाचवेळी दोन आघाड्यांवर काम करणे शक्य नाही… त्यासाठी
इ. १२ वी लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर अकरावी परीक्षांचे आयोजन करणे आवश्यक आहे, त्यासाठी तातडीने राज्यातील सर्व संस्थाचालक, प्राचार्य /मुख्याध्यापक यांना लेखी निर्देश द्यावेत.
सध्या जीओ सर्वे अँपद्वारे १२ वी भूगोल च्या विद्यार्थ्यांनी १५ कुटुंबांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे बालभारतीकडून निर्देश दिले आहेत. तथापि कोरोना संसर्ग तीव्रता व बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नाहीत. दुर्गम भागात रेंज येत नाही.. इ. अडचणी लक्षात घेता अॅपद्वारे सर्वेक्षण करणे धोकादायक व अव्यवहार्य ठरत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण थांबवावे अशी पालक व विद्यार्थी आणि शिक्षकांमधून जोरदार मागणी आहे. विज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिकांची संख्या कमी केली त्याप्रमाणे भूगोलसाठी अॅपद्वारे सर्वेक्षण हा भाग कमी करावा.
जर कोरोना संसर्गाची तीव्रता मे /जून २०२१ पर्यंत कमी झाली नाही तर पहिली ते नववी व अकरावी वर्गांच्या परीक्षा न घेता सरसकट विद्यार्थ्यांना वरच्या वर्गांत घालण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे वाटते.असंख्य शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मागणीनुसार ही समस्या आपल्या निदर्शनास आणून दिली आहे.

जून मध्ये अकरावीची परीक्षा घेणे शक्य झालेच तर फक्त वार्षिक परीक्षवर निकाल जाहीर करता येईल. अकरावी निकाल कसा करावा याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही संबंधित उच्च माध्यमिक /कनिष्ठ महाविद्यालयीन मुख्याध्यापक व प्राचार्य यांने देणे उचित ठरेल.
कृपया वरील बाबतीत तातडीने निर्णय घेण्यात यावीत असे निवेदन व माहिती प्रा. एन. डी. बिरनाळे
कार्याध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस यांनी दिली आहे.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!