आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

दालमिया सिमेंट कंपनीतर्फे पहिले ५१ सिमेंट बॅग नारंडा येथील भवानी मंदिरास भेट

सेजारी गावकऱ्यांच्या मागण्यात होणार वाढ

…. कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी मागील काही महिन्यांपूर्वी सुरू झाली असून सद्या सिमेंट कंपनीचे उत्पादन सुरू करण्यात आलेले आहे.तरी कंपनीचे कार्यकारी संचालक हक्कीमुद्दीन अली व कंपनीचे शाखा प्रबंधक सुनील भुसारी यांच्या पुढाकाराने कंपनी मध्ये उत्पादन झालेले पहिले ५१ बॅग्स सिमेंट नारंडा गावातील आराध्य दैवत भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता भेट दिलेले आहे.
सदर कंपनी हि मागील ५ वर्षांपासून बंद अवस्थेत होती सदर कंपनी ही दालमिया भारत समूहाने विकत घेतली असून सद्यस्थितीत कंपनीचे उत्पादन सुरू झालेले आहे.त्यामुळे गावातील भवानी माता मंदिरास उत्पादनातील पहिले ५१ बॅग्स सिमेंट भेट दिलेले आहे.
यावेळी कंपनी मधून सिमेंट भरलेली पहिली गाडी निघताना पूजा करण्यात यावेळी एचआर प्रमुख उमेश कोल्हटकर,राजेश जुनोनकर,चंद्रदीप टामटा,मरगडे सर,चंदेलीयन सर,प्रशांत भीमनवार,गौरव वांढरे यांची उपस्थिती होती.
यावेळी भवानी मंदिराच्या जिर्णोद्धाराकरीता सिमेंट भेट दिल्याबद्दल नारंडा गावच्या सरपंच अनुताई ताजने,उपसरपंच बाळा पावडे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सिमेंट कंपनीचे आभार व्यक्त केले आहे.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!