आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

शिधावाटप पत्रिका सुरु करून गरिबांना दिलासा द्यावा

गेल्यावर्षी कोणा टाळेबंदी काळात अंधेरी ते कांदवली परिमंडळातील ताजी त्रेशा खाली बंद झालेल्या शिधावाटप पत्रिका परत सुरू करून गरजू कुटुंबांना दिलासा द्यावा.
अशी आग्रही मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका विनया विष्णू सावंत यांनी आमदार सुनील प्रभू यांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
गेल्यास टाळेबंदी काळातले दारिद्र्यरेषेखालील शिधावाटप धारक कुटुंब गावी गेले होते. टाळेबंदी चा कालावधी मोठा असल्याने मुंबईतील त्यांच्या घरात कोणी सदस्य नसल्याने त्यांचे वगैरे बंद घरे बंद होती. त्यानंतर परत सदर कुटुंब मुंबईत परत आल्यानंतर दारिद्र्यरेषेखालील मिळणारी धान्याची सुविधा बंद झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे धान्यापासून वंचित झालेल्या या कुटुंबास समोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
त्यामुळे धान्यापासून वंचित झालेल्या या कुटुंबांना पुन्हा या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी अंधेरी ते कांदिवली परिमंडळातील रद्द झालेल्या दारिद्र्यरेषेखालील शिधावाटप पत्रिका धारकांची नावे पुन्हा पूर्वीच्या सदर मूळ योजनेत समाविष्ट करून त्यांना पूर्ण धान्य पुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी जातीने लक्ष घालून संबंधितांना आदेश द्यावेत. अशी विनंती आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!