आपला जिल्हाब्रेकिंग
जालन्यात पारस एजन्सीवर भरदिवसा दरोडा.

जालना/प्रतिनिधी:दि.9
जालन्यातील साबरमल झाला यांच्या मालकीच्या पारस एजन्सीवर भरदिवसा 3 दरोडे खोरांनी दरोडा टाकला असून एजन्सी मालकाशी, नोकराशी झटापट करून चाकूने वार केल्याने डोक्यात जबर मार लागला. दोघांना जखमी करून अंगठी, गळ्यातील चेन, व ड्रॉपमधील 25 हजार रुपये घेऊन पसार झाले.पोलिसांच्या वतीने शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, स्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे.दुपारी बारा ते साडे बारा दरम्यान दुकानात खरेदीसाठी घुसून मालकाशी झटपट करून पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून व मारहाण केली या झटापटीत जबर मार लागला असून त्यांनाही जखम झाली आहे. व लुटेरे लूट करून पळून गेले.