संजीवनी प्रायमरी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे
टेंभुर्णी प्रतिनिधी /मयूर मगर

टेंभुर्णी संजीवनी प्रायमरी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून स्वामी महेशगिरी महाराज हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गौतम म्हस्के, संतोष भाऊ पाचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे हे उपस्थित होते. प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चिमुकल्यांच्या नृत्याने सर्वांचे मने जिंकली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करीत पालकांची मने जिंकली येथील जिरेमाळी मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतीश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष घोडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश चंदनशिवे, ज्योती सांगळे, भाग्यश्री जाधव, कविता देशमुख, वर्षा डोमाळे, सुनिता कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.