0 0 0 0 3 0
महाराष्ट्र

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल,माध्य.व उच्च माध्य. विद्यालय टेंभुर्णी येथे राजमाता राष्ट्रमाता मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.

टेंभुर्णी प्रतिनिधी/मयुर मगर

आज दिनांक 13 जानेवारी ला राजमाता जिजाऊ विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी जिजामाता महिला विकास व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व नगरपंचायत जाफराबादच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सुरेखाताई संजयजी लहाने यांनी सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री यु.बी.वाघ सर व जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जीआर वायाळ हे होते.सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दीपक बोराडे, श्रीप्रशांत लहाने,श्रीरमेश उजेड श्री रवींद्र उगले, श्री रघुनाथ पुंगळे, श्री सारंगधर सारंगधर जंजाळ, श्री राहुल भिसे, श्री गजानन चिडे, सौ.उषा मुडेकर सौ.अश्विनी लहाने सौ.स्नेहल गिरणारे सौ.सोनाली कामे सौ.अमृता कुलथे सौ.अश्विनी सपाटे सौ.रिजवाना पठाण सौ.प्रियंका पुंगळे सौ.वर्षा देशमुख सौ.दुर्गा भोरजे सौ.वंदना शिंदे सौ.ज्योती जमदाडे सौ.कविता वाघमारे सौ.नंदा चव्हाण यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक यु.बी.वाघ यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी प्रास्ताविक पर भाषण केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दीपक बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना व समाजातील प्रत्येक स्त्रिया व नागरिकांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला पाहिजे असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे करायला पाहिजे याविषयी माहिती सांगितली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान केलेली होती. यामध्ये अनुष्का कामे, आरती गिरणारे, युरज्ञी जमदडे, राजेश्वरी वाघमारे, अर्जुन मोरे, साई कामे, आराध्या कोरडे, यांचा सहभाग होता. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बकाल मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन जाधव मॅडम यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक या एन.एम शेख, पीव्ही खेडेकर, व्ही एस उबरहंडे,के आर घुणावत, ए.एस.तेलंग्रे,एपी.व्ही दाते बि.आर.लहाने सोळंके मॅडम, रिंढे मॅडम, सुद्रिक मॅडम, विमल मदन, व्हीडी धावलीया,अंकुश जोशी, रोकडे अंकल,इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 0 0 3 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे