आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री बाळ मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ल्याचा गणराज, दयाळदास रोड, विलेपार्ले पूर्व*

सदर मंडळाने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम पार पाडले असून बृहन्मुंबई महानगर पालिका, सामाजिक संस्था व लोकसत्ता यांच्या मार्फत अनेक पारितोषिके संपादन केली आहेत.
तसेच शासनाच्या खांद्याला खांदा लावून विलेपार्ल्याच्या गणराज मंडळाने वैश्विक महामारी कोरोनाच्या संकट काळात गरीब व गरजू लोकांसाठी धान्य वाटप, जेवण वाटप, निर्जनतुकीकरण अशा अनेक प्रकारचे नागरिकांसाठी मोलाचे सहकार्य केले. यातचं महत्वाचे म्हणजे विभागातील नागरिकांसाठी खासदार – पूनमताई महाजन, विलेपार्ले आमदार – ऍड. पराग अळवणी, नगरसेविका – ज्योतीताई अळवणी, विधानसभा अध्यक्ष – मिलिंद शिंदे यांच्या सहकार्याने भाजपा माजी वॉर्ड अध्यक्ष स्वर्गीय अभिषेक भार्गव यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त मोक्षरथ (शववाहिनी ) चे लोकार्पण करून या मोक्षरथाची संचालकाची जबाबदारी विलेपार्ल्याचा गणराज मंडळ व मंडळातील पदाधिकारी श्री राहूल शिंदे, जिग्नेश पटेल, शैलेश शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ही सेवा विलेपार्ले मधील नागरिकांना विना मूल्य देण्यात येणार आहे.
सदर माहिती केंद्रीय पत्रकार संघ ( पदाधिकारी ) श्री. भूषण मडव यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!