ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीनारायण पिपरिये यांचे निधन

जालना प्रतिनिधी
जालना येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीनारायण पुरुषोत्तमजी पिपरिये यांचे दि. २३ जानेवारी २०२३ – सोमवार रोजी दुपारी दुःखद निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीनारायणजी पिपरिये मागील ४० ते ४५ वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक पत्रकारिता, धार्मिक आदि क्षेत्रात कार्यरत होते. मनमिळावू स्वभावाचा व्यक्तिमत्वामुळे ते सर्वाचे परिचित होते. ते जालना व्यापारी महासंघाचे कार्यकारी सचिव, दी. जालना पिपल्स को-ऑप बैंक चे माजी संचालक, महाराष्ट्र कृषि साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना भारत स्काउट ॲण्ड गाईडचे डिस्ट्रीक्ट चीफ कमिशनर, अपना क्रियेटिव्ह क्लब, भारत रुग्न सेवा दवाखाना, एड्स प्रतिबंधक समिती, जिला अंध कल्याण सेवा केंद्र, बहाई संसद, महाराष्ट्र राज्य बिलोत्पादन शेतकरी संघटना चे अध्यक्ष होते. त्यांनी आर्य हिंदी विद्यालय समिती मध्ये सचिव पद, दशहरा महोत्सव समितित महासचिव, श्रीगणेश महासंघ मध्ये जनसंपर्क प्रमुख, सर्वधर्म समभाव समिती, ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय, जिला पत्रकार भवन, दी जालना मर्चंट को – ऑप बैंक, दी जालना नगर बैंक आदी नामांकित संस्था व ६० हून अधिक संघटना, क्लब, समितील वेग-वेगळ्या पदावर राहुन सामाजिक, शैक्षणिक, जनहित कारी कार्य केले. त्यांची अंत्ययात्रा
मंगळवारी २४ जानेवारी २०२३ सकाळी १०.०० वाजता निजी निवास, कुलकर्णी हॉस्पीटल जवल, आर.पी. रोड जालना येथून निघणार आहे. त्यांचावर अमरधाम श्मशानभूमि जालना येथे अंतिम संस्कार करण्यात येईल. ते पिपरिये अँडस जाहिरात संस्थाचे प्रोप्राइटर होते. त्यांनी मरणोपरांत नेत्रदान केले. ते सामाजिक कार्यकर्ते हिरालाल पिपरिये यांचे मोठे बंधु व विक्रम पिपरिये यांचे वडील होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, चार मुलगी (मुली), सुन, नातू आदीचा मोठा परिवार आहे.
=======================
हिरालाल पिपरिये 9422723340
विक्रम पिपरिये 9422219327