आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

लसीकरणावर भर देणार

मुंबई, 10 जून: मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशातच मुंबईतील कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याचं चित्र दिसून येतं आहे. मुंबई पालिकेकडून लसीकरणावरही भर दिला जात आहे. मुंबईत वेगानं लसीकरण सुरु आहे. प्रत्येक मुंबईकरांनी लस घ्यावी यासाठी प्रशासन विविध योजना ही आखत आहे. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पन्नास हजार मुंबईकरांनी लशीचा दुसरा डोस घेतला नसल्याचं समोर आलं आहे. यासाठी पालिकेनं,आता अशा व्यक्तीचं ट्रेसिंग सुरु केलं आहे.
मुंबईत काही लोकांनी पहिला डोस घेतला. त्यानंतर वेळ निघून गेल्यानंतरही लसीचा दुसरा डोस घेतला नाही आहे. मुंबईत अशा लोकांचा आकडा पन्नास हजारांहून अधिक आहे. त्यामुळे पालिकेनं आता अशा लोकांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!