आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्ह्यात आज १२७ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; तर एकाचाही मृत्यु नाही.

मागील सात दिवसात कोरोना रूग्णवाढ स्थिरावली.

▪️तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने प्रशासनाचे नियोजन.
▪️गर्दी न टाळल्यास संभाव्य धोका.
▪️लहान मुलांच्या आरोग्यावर प्रशासनाचे लक्ष केंद्रित.
▪️सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर १.७%. पॉझिटिव्हीटी दर ५% च्या वर गेल्यास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा पुन्हा लॉकडाऊनचा इशारा.

नांदेड-
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागली असून लॉकडाऊन शिथिल झाल्याने रस्त्यांवरची गर्दीही वाढू लागली आहे. कोरोना रूग्णवाढीमुळे रखडलेले घरगुती सोहळे, लग्न सोहळे, इतर कार्यक्रमाची लगबग वाढली आहे. एका बाजूला ही स्थिती असताना दुसरीकडे प्रशासन तिसरी लाट थोपवण्यासाठी कामाला लागले आहे. दुसरी लाट बरेच नुकसान करून कशीबशी ओसरत असतानाच तिसरी लाट नेमकी कधी येईल याचा अंदाज कोणालाच नाही. त्यामुळे प्रशासन आता तिसरी लाट येऊ नये म्हणून मैदानात उतरली आहे, याची जाणीव ठेवून जिल्हावासियांनी सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

नांदेड कोरोना अलर्ट:-

(दि. १० जून २०२१, सायं. ६:२५ वा.)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
२९९९.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
१२७. (पॉझिटिव्ह दर- ४.२३%)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
५५
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
६०
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
१२

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
७२.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
५५.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
९०८२६.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- ०.

✅नांदेड मनपा क्षेत्र मृत्यूसंख्या-

✅नांदेड ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या-

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
१८९४.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- १३९.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
८७७७५.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
(९६.६४%)

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
६२२.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
११

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!