आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

जाणिव सामाजिक संस्थेद्वारे शेतकऱ्यांना मदत

विरार।प्रतिनिधीः जाणीव सामाजिक संस्था आणि नाँर्श फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रमाद्वारे मदत करण्यात आली,यामध्ये २५ गरजुंना त्यांच्या घरांवर प्लास्टिक टाकण्यात आले.१३ छोट्या व गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टरने उखळी करून देण्यात आली.
१०० शेतकऱ्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी लागणारे कापड प्लास्टिक ( खोळ) वाटप करण्यात आले. २० गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आल,व लहान मुलांना नेस्ले कंपनीचा खाऊ वाटप करण्यात आला श्री मोहन पाटील सर यांनी गरजुंना टॉवेल वाटप केले हे सर्व उपक्रम ८- टप्प्यात आणि सोशल डिस्टिंसन राखून पार पाडण्यात आले. हा उपक्रम सुरळीत पार पडण्यासाठी श्रीमती सीमा मॅडम अशोक किणी व रोशन भोईर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!