आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

दक्ष माणिकपूर मेडिकल ग्रुप तर्फे रविवार

दिनांक १३ जून रोजी सकाळी ०९ ते १२ या वेळेत तेजोमय हॉल,संत मायकल चर्च, माणिकपूर येथे ६ महिने ते १८ वर्षे पर्यंतच्या बालकांना रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी मदत करणाऱ्या इन्फ्लुएंझा लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आली होती. या लसीकरण शिबिरास माणिकपूर पंचक्रोशातील लोकांनी उत्तम प्रतिसाद देऊन २३७ बालकांचे लसीकरण करण्यात आले. भय इथे थांबत नाही ह्या प्रमाणे करोना विषाणूचे गडद मलभ दाटलेले असतानादेखील इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण शिबिरास सहकार्य लाभले हा सुखद आनंद मानावा लागेल.शासनाच्या सर्व अटी शर्तींचे पालन करून आयोजकांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शिबिर आयोजित केले होते सकाळी ०९ वाजता माणिकपूर पॅरिसचे धर्मगुरू फादर जॉन फरोज यांनी प्रार्थनेने सदर शिबिराची सुरुवात केली.लहान मुलांवरील पुढील संभावित धोका लक्षात घेता माणिकपूर पॅरिसमध्ये सदर शिबिराचे आयोजन होत असल्याबद्दल त्यांनी आयोजकांना धन्यवाद देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.शेवटी श्री.अॅलन डिमेलो ह्यांनी सदर शिबीरास ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मदत केली त्या सर्वांचे आभार मानुन बाळरोगतज्ञ डॉ.सिल्विया व डॉ.प्रफुल्ल राणे तसेच माणिकपूर गावातील परिचारिका यांचे विशेष आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!