आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

स्वातंत्र्योतर काळात भारतीय समाज लहान मोठ्या अश्या बऱ्याच जातीय दंगलींचा साक्षीदार राहिला आहे, ज्या

मध्ये अनेक माणसांचे बळी गेले. हिंदू, मुस्लीम, शीख, पारशी व बौद्धांना जागरूकता आल्याने अनेक जीव घेतलेल्या
सांप्रदायिक दंग्यांमागील कार्यपद्धती आता जनतेला समजली आहे.
मंदिर मस्जिद मध्ये मांस फेकणे, चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह भाषा वापरून जमावाची माथी भडकावणे, खोटे
आरोप करून एकमेकांवर हल्ले करवणे, अफवा पसरवणे या सगळ्या क्लुप्त्या दंगली घडवून आणणाऱ्या समाजविघातक
संघटनाचेच कारस्थान असते हे आता समाजाच्या लक्षात आले आहे. जेंव्हा हि सगळी कारस्थाने अपयशी ठरतात तेंव्हा
बॉबब्लास्ट आणि मॉब लीन्चींग सारखी कृत्या वापरली जातात. त्याच प्रमाणे मुझफ्फरपुर येथे केलेला प्रयत्न देखील
फसलेला आहे.
सध्याच्या सरकारचे सर्व आघाडयावरील अपयश आता सर्वांसमोर आले आहे. मुस्लीम आणि ‘इतर धार्मिक
समूहांच्या भावना उचकवन्या साठी वापरले जातात. आत्ता काही संघटनांकडून भावनिक व धार्मिक मुद्यांना हात घातला
जाईल, पवित्र कुराण, पैगंबर मोहम्मद स.अ. आणि इतर धार्मिक गुरु अथवा व्यक्तीमत्वांच्या संदर्भाने निंदनीय व आक्षेपार्ह
भाषा वापरून समाजाला चिथावल जाईल व देशात दंगलीच वातावरण तयार केल जाईल असे आमचे मत आहे.
उपरोक्त परिस्थिती संदर्भाने विचार केल्यास हा कायदा संसद व विधानसभेत मांडल्यानंतर देशात धार्मिक, सामजिक
आणि वांशिक भावना कलुषित करण्याच काम केल जाईल अशी आमची धारणा आहे. येणाऱ्या नजीकच्या काळात होऊ
घातलेल्या संसद व महाराष्ट्र विधानसभेच्या दोन्ही सदनांच्या अधिवेशनात हे बिल मांडले जाईल, याची दक्षता घेणे हि
आमची जबाबदारी असेल.
पुढील पदाधिकारी पत्रकार परिषद संबोधित करतील.
अॅड. प्रकाश आंबेडकर – राष्ट्रीय अध्यक्ष
डॉ. अरुण सावंत-जेष्ठ उपाध्यक्ष
मान. रेखाताई ठाकूर – महिला आघाडी अध्यक्ष
मान. फारुख अहमद – पक्ष प्रसिद्धी प्रसिद्धी प्रमुख
प्रा. सज्जाद म्हापारी
अॅड. सुलतान खान

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!