आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंबई मराठी पत्रकार संघ

येथे आज दिनांक 17/ 6/2021रोजी, वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
पत्रकार परिषदेमधील मान्यवर
उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत
प्रसिद्धीप्रमुख फारुख अहमद
सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्र सरकार हे वेगवेगळ्या प्रकारांनी देशामध्ये दंगली घडविण्याचा प्रयत्न करणार आहेत ,असाच प्रयत्न यापूर्वी या देशांमध्ये झालेला आहे परंतु सध्याची जनता ही सुज्ञ असल्यामुळे पूर्वी जशा जातीय दंगली झाल्या तशा दंगली होण्याची शक्यता नाही म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून केंद्र सरकार म्हणजे भाजपा हे देशांमध्ये दंगली घडविण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये मुस्लिमांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर व त्यांचा पवित्र ग्रंथ कुराण
व हिंदू देव-देवतांची विटंबना अशा विषयाला खतपाणी घालून दंगली घडविल्या जातील असा माझा केंद्र सरकारवर आरोप आहे असे , वक्तव्य श्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेले आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्न उत्तर कार्यक्रमांमध्ये खालील प्रश्न उपस्थित करण्यात आले.
1. कोल्हापूर मध्ये खासदार संभाजीराजे यांनी आपली भेट घेतली म्हणजे आपण मराठा आरक्षणाला पाठिंबा देणार काय,
उत्तर
मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे परंतु खासदार संभाजीराजे यांना मी सांगितले की सत्तेशिवाय मराठा आरक्षण मिळू शकत नाही व सत्तेमध्ये असलेल्या लोकांना मराठा आरक्षण विषयी काही घेणेदेणे नाही म्हणून सत्तेत येणे हे गरजेचे आहे व काळाची गरज आहे.
2 सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केलेले नाही
तसेच मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेली पाच टक्के मुस्लिम आरक्षण तेसुद्धा रद्द केलेले नाही,
उत्तर
राज्य सरकारला आरक्षण विषयी काही घेणेदेणे नाही त्यांना आरक्षण विषयी जर विशेष रसता त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी योग्य ते प्रयत्न केलेले दिसून येत नाही
3. आरक्षण कसे मिळेल,
उत्तर
राज्याराज्यांमध्ये जात निहाय जनगणना होणे आवश्यक आहे म्हणजे जातीचा आयोग नेमला जाईल व आयोगामार्फत राज्य पाला मार्फत शिफारशी केल्या जातील त्या वेळेला आरक्षण मजबुतीकरण होईल.
4 आपल्या पक्षाचे खासदार आमदार नगरसेवक कोणीही नाही,
उत्तर
माझी संघटना अजूनही शाबूत आहे ज्यांचे आमदार-खासदार आहेत त्यांची संघटना अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!