आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रति, मा.संपादक

मुंबई, मंगळवार दि.२७/०७/२०२१

पूरग्रस्त विद्यार्थ्यांन समवेत राज्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा छात्रभारतीची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी..

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या व महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी हिताच्या मागण्या संदर्भात आज शालेय शिक्षणमंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांची मंत्रालयात भेट घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याची विनंती केली..

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून तातडीने पाठ्यपुस्तकांची छपाई करुन ती विद्यार्थ्यांना मोफत वितरीत करावी. सोबतच संपूर्ण शैक्षणिक साहित्य मोफत देऊन संपुर्ण शैक्षणिक शुल्क माफी करावी..

सोबतच ६ मार्च १९८३ च्या १२ वी पर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाची कठोर अंमलबजावणी सर्व अनुदानित,विनाअनुदानित व खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये करावी, करोनाच्या काळात विद्यार्थी-पालकांची लूट थांबवावी, विद्यार्थांचे शैक्षणिक शुल्कात कपात करावी व संपुर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी एका अभ्यासक्रमासाठी एकच फी असावी व ती शासनाने ठरवून द्यावी अश्या प्रमुख मागण्यांसमवेत विविध मागण्यांचे निवेदन छात्रभारतीचे राज्यकार्याध्यक्ष रोहित ढाले,राज्यसंघटक सचिन बनसोडे,मुंबई कार्याध्यक्ष सचिन काकड व साथी निलेश झेंडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिले..

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!