आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्हा पत्रकारांना अपघाती विमा प्रदान करणार

महेश (बाळु) खोमणे

नांदेड – प्रतिनिधी -जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकाराचां मोफत अपघाती विमा प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्र.कार्यकारणी सदस्य महेश ( बाळु) खोमणे यांनी दिली आहे.
पत्रकार बांधव हे समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून ते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत. पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सातत्याने सुरू असते. हीच बाब लक्षात घेऊन या वर्षी पत्रकारांच्या कुटुंबीयांना एक छोटासा आधार म्हणून खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अपघाती विमा देण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. खासदार चिखलीकर हे समाजातील सर्व घटकांशी जोडलेले असल्याने त्यांची पत्रकारांसोबत चांगली नाळ जुळलेली आहे. पत्रकार बांधवांनीही खासदार चिखलीकर यांच्या कार्याची दखल आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांच्या सोबत असणारे नाते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आणि पत्रकार बांधवांच्या कुटुंबीयांना एक आधार मिळावा म्हणून हा छोटासा प्रयत्न असल्याचे महेश (बाळु) खोमणे म्हणाले.
दरम्यान जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना आपला विमा मिळावा यासाठी https://forms.gle/qBeAS5fXPj5Pz5sQ8 या लिंक वर गुगल ॲपच्या नोंदणी फॉर्मच्या माध्यमातून आपला अर्ज सुनिल रामदासी यांच्या कंडे संपूर्ण माहितीसह भरून पाठवावी, असे आवाहन संयोजक तथा महेश (बाळु) खोमणे यांनी केले आहे.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!