आपला जिल्हामहाराष्ट्र

हिरकणी वस्तीस्तर बचत गटातर्फे कोकण आपत्तीग्रस्तांना मदत

नालासोपारा।सुर्यकांत देशपांडे गेल्या महिन्यातील पावसाने हाहाःकार उडून कोकणवासियांची मोठी तारांबळ उडाली, यात काही ठिकाणी अनेक दुर्घटना हि घडल्या. त्यामुळे कोकणवासीयांसाठी सर्व बाजुनी मदतीचा ओघ सुरु झाला.
यातच नालासोपारा येथील हिरकणी वस्तीस्तर महिला बचत गटांने श्रीमती सुधा यादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकारी महिलांनी आपला खारीचा वाटा उचलून महाड येथील कोकण वासियांसाठी जिवनांवश्यक वस्तु या मध्ये दैनंदिन वापराचे समान,कपडे, अन्नधान्य, आदीं चिज वस्तुची मदत नुकतीच महाड येथील पाठविण्यात आली.या साठी बचतगटाच्या साक्षीनाडर,श्रध्दा पलांडे, अजंली कांबळे,वेदिका, अलका गडिया,कुंदा शेलार, पंडित,प्राजक्ता शिंदे आणि सारिका पोतुले आदी महिलांनी हिरीरीने पुढाकार घेतला.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!