कायमस्वरूपी मागण्या…
१. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विखुरलेल्या रंगकर्मींची शासन दरबारी नोंद व्हावी.
– लवकरात लवकर नोंद होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंद करण्याचे मंत्री महोदयांचे आदेश.
२. कलाकार पेन्शन योजनेसाठी लाभार्थींच्या मर्यादा संख्येत वाढ करावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटींमध्ये शिथिलता
आणावी. तसेच मानधनाच्या आकड्यात वाढ करावी.
– मानधनाचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या अटीमधे बदल करणार.
३. रंगकर्मी हा असंघटित आहे. माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर ‘रंगकर्मी बोर्डा’ची स्थापना करावी.
– रंगकर्मी बोर्डाची स्थापना होणार, मसुदा बनविण्यासाठी रंगकर्मींच्या प्रतिनिधींना सहभागी करण्याचा निर्णय झाला.
४. मुंबईत कला सादर करण्यासाठी येणाऱ्या रंगकर्मींना भाडेतत्वावर देण्यासाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या निवासी गाळ्यांमध्ये
प्राधान्याने व सवलतीच्या दरात सोय करण्यात यावी. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रंगकर्मींसाठी विश्रांतीगृह असावीत.
– प्राधान्याने विचार करून सोय केली जाणार.
५. शासनातर्फे रंगकर्मींसाठी राखीव ठेवलेल्या म्हाडा व सिडकोच्या घरांसाठीच्या संख्येत ५% वाढ करावी.
– तत्वतः मान्यता, लवकरच शासन निर्णय जाहीर करणार.
६. निराधार, वयोवृद्ध रंगकर्मींची शासकीय आणि खासगी वृद्धाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी. सोबत त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी.
– यासाठी तात्काळ काम करण्याची गरज असल्याचे मंत्री महोदयांनी मान्य केले. यासंबंधी निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल.
७. महाराष्ट्रातील सरकारी तसेच नगरपालिका / जिल्हापरिषद हॉस्पिटल्समध्ये रंगकर्मींसाठी राखीव बेड असावेत.
– हे करता येणार नाही असे सांस्कृतिक मंत्र्यांनी सांगितले, तेव्हा रंगकर्मींच्या शिष्टमंडळाने हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारने जागा द्यावी अशी मागणी केली. यासंदर्भात संबंधित खात्यासोबत बैठक लावण्याचे मंत्री महोदयांनी मान्य केले.
सूर्यकांत देशपांडे ज्येष्ठ पत्रकार यांना वाढदिवसाच्या सुपरफास्ट24न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा