ब्रेकिंग

🙏💐 गणेशोत्सव २०२१🙏💐

दि.१०/९/२०२१ पासून चालू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी के पूर्व विभाग कार्यालयाच्या हद्दीतील येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधी व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती व लोकप्रतिनिधी यांची बैठक आज दि.१/९/२०२१ रोजी सकाळी १० ते १२.३० नटवर नगर,मनपा.शाळा,आर.के.सिंग रोड जोगेश्वरी पूर्व नंतर विलेपार्ले पूर्व शहाजी राजे मनपा शाळा येथे दुपारी २.०० ते ४.०० नंतर अंधेरी येथील गुंदवली मनपा शाळा येथे सायंकाळी ४.०० ते ६.०० या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला जोगेश्वरी मध्ये विधानसभा लोकप्रतिनिधी नगरसेवकमा.श्री.अनंत(बाळा)नर (सुधार समिती सदस्य) तसेच मा.श्री.प्रविणजी शिंदे(बेस्ट समिती सदस्य) उपस्थित होते.
तसेच महानगरपालिका के पूर्व मनपा. अधिकारी,एम.आय.डी.सी व मेघवाडी पोलिस ठाणे विभाग पोलीस अधिकारी आर.टी.ओ ऑफिसर आणि अग्निशामक दलाचे अधिकारी तसेच गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवासाठी मंडळासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात प्रशासन पोलीस अधिकारी वतीने उपस्थित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांना उत्सव साजरा करण्याविषयी योग्य असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती चे अध्यक्ष श्री नरेश दहिबावकर सर यांच्या अध्यक्षतेखाली समिती कडुन आलेल्या सुचना व नियमावली चे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समन्वय समितीच्या वतीने हि गणेशोत्सव परवाना करिता येणाऱ्या मंडळ पदाधिकारी यांना १ विन्डों योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या परवाना करिता सुचना व मार्गदर्शन केले महानगरपालिकेने ही सहकार्य करावे गणेशोत्सवा पर्यंत अशी सुचना करण्यात आली.तसेच रोड खड्डे बुझविणे, रोडच्या दोन्ही बाजूने असलेली Parking गणपती विसर्जन वेळी* होणाऱ्या गैरसोय विषयी समस्या विषयी चर्चा करण्यात आली.व मोठ्या प्रमाणात असलेल्या Parking ठिकाणी NO PARKING असे फलक लावण्यात यावे असे मनपा. अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
नियमानुसार झालेला बदल व समन्वय समितीच्या पाठपुराव्यामुळे मंडळांना दिलासा मिळाला व्यवसायिक जाहीरात, मुर्तीची उंची, कुठल्याही पद्धतीने मंडळाकडून हमीपत्र भरून घेऊ नये, मंडळांना विसर्जन वेळी दोन लसीकरण पुर्ण झालेल्या पदाधिकारी यांना विसर्जन स्थळी अनुमती दिली आहे.
१० दिवस साजरा होणाऱ्या गणेशोत्सव करिता मंडळानी प्रशासनाला व प्रशासनाने मंडळाना विसर्जन स्थळी विसर्जन वेळी सहकार्य करावे व हा गणेशोत्सव सण मंगलमय वातावरण व शासनाच्या नियमानुसार साजरा करावा असे सुचित करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती समन्वय समिती श्री शिवाजी खैरनार (सह कार्यवाहक) व सदस्य श्री भुषण मडव, श्री बाळा लाड, श्री संतोष सावंत, सौ पौर्णिमा भोमे, श्री सुधाकर पडवळ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!