ब्रेकिंगमहाराष्ट्र

पीएफसीचे संचालक शिवाजी पाटील यांचा सत्कार करताना शैलेंद्र बदनापूरकर पाटील फाऊंडेशन सेंटरची नवीन शाखा सुरू

जालना जिल्हा प्रतिनिधी गौरव बुट्टे 

शहरातील गांधी चमन रोडवरील आबड कॉम्प्लेक्स येथे पाटील फाऊंडेशन सेंटरच्या नवीन शाखा सुरू झाली आहे . गुरुवारी या शाखेचे उद्घाटन करण्यात आले . डॉक्टर , इंजिनिअर बनण्यासाठी आवश्यक असलेल्या जेईई , नीट व सीईटी परीक्षेची तयार करण्यासाठी पाटील फाऊंडेशन सेंटरने कोटा पॅटर्न शहरात आणला आहे . त्यास जिल्हाभरातील पालक व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला . विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे या सेंटरची नवीन शाखा सुरू आबड कॉम्पलेक्स येथे सुरू करण्यात आली . पाटील फाऊंडेशन सेंटरचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पाटील , सविता पाटील , संचालक कृष्णा म्हस्के , पूजा म्हस्के , पाटील फाऊंडेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन गिरी , सविता गिरी यांचा शैलेंद्र बदनापूरकर दाम्पत्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ . शिवराज मिरकर , डॉ . अश्विनी मिरकर , प्रसिद्ध उद्योगजक अंकित आबड यांची उपस्थिती होती .

 

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!