ब्रेकिंग

रवी राजा यांची मागणी.

रवी राजा यांची मागणी. खाजगी बस चालकांना वेळेवर न मिळाल्याने त्यांनी संप पुकारला. त्यामुळे प्रवाशांची फरफट झालीच पण बेस्टचे नावही खराब झाले, त्यासाठी कंत्राटदार कंपनी जबाबदार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवि राजा महाव्यवस्थापकांना एका पत्राद्वारे केली आहे.

एम. पी. ट्रान्सपोर्ट मार्फत चार आगारांमध्ये खाजगी बस चालक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना वेतन न मिळाल्यामुळे ते संपावर गेले. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. बेस्ट उपक्रमाने खाजगी कंपनीला प्रत्येक किलोमीटर प्रमाणे संपूर्ण अधिदान रक्कम दिलेली आहे तरीही तीन चार आगारांमध्ये खाजगी कर्मचारी संपावर गेल्यामुळे बेस्ट उपक्रमाला भुर्दंड सहन करावा लागला आहे. असे रवि राजा यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!