ब्रेकिंग

किड्स इंटेलिजन्सने शिक्षकांना केले सन्मानित

किड्स इंटेलिजन्सने शिक्षकांना केले सन्मानित
मुंबई- शिक्षक हा समाजाचा पाया असतो. नवीन पिढी घडविण्याचे महत्कार्य शिक्षक करतात हे ओळखून किड्स इंटेलिजन्स संस्थेने शिक्षक निर्माण करण्यास सुरुवात केली. या गुणी शिक्षकांचा गुणगौरव नुकताच विलेपार्ले येथे पार पडला.
विविध श्रेणीमध्ये शिक्षकांना गौरविण्यात आले. ‘सपोर्टीव्ह टीचर ऑफ दी इअर’ हा पुरस्कार फाल्गुनी पारिख आणि रिया घाणेकर यांना प्रदान करण्यात आला. ’रायझिंग स्टार टीचर ऑफ दी इअर’ श्रेणीत राधिका कुलकर्णी, ‘अचिव्हर टीचर ऑफ दी इयर’ श्रेणीत दिव्यश्री भास्कर, रिया घाणेकर, ‘मा
स्टर टीचर ऑफ दी इयर’ केतकी साबळे, ‘बेस्ट एक्सपर्ट अबॅकस टीचर ऑफ दी इयर’- दिव्यता परब, ‘एक्सेप्शनल परफॉर्मन्स ऑफ दी इयर’ फाल्गुनी पारिख, ‘टीचर्स अबॅकस कॉम्पिटीशन’ विजेते ठरलेल्या मानसी कदम, श्रद्धा म्हात्रे, भक्ती अहिरे, मुनिरा भानपूरवाला, हितिशा मेहता, तन्वी परब आणि रिया घाणेकर या शिक्षिकांना गौरविण्यात आले.
शिक्षकांमुळे समाज घडतो. त्यामुळे आम्ही स्मार्ट अबॅकस आणि वैदिक गणित या विषयातील तज्ज्ञ शिक्षक घडावे यासाठी प्रशिक्षण देऊन शिक्षक घडविले. या घडलेल्या काही गुणी शिक्षकांना किड्स इंटेलिजन्स तर्फे सन्मानित करण्यात आले, असे किड्स इंटेलिजन्सच्या संचालिका शुभदा भावे यांनी सांगितले.
गेली एक दशकाहून अधिक काळ किड्स इंटेलिजन्स ही संस्था अबॅकस आणि वैदिक गणित विषयामध्ये लहान मुलांना प्रशिक्षण देण्य़ाचे कार्य करत आहे..

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!