ब्रेकिंग

काल महाराष्ट्र सरकारच्या मागासवर्गीय विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या ०४ महामंडळांना ३५०० कोटींहुन अधिकचा निधी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आला

काल महाराष्ट्र सरकारच्या मागासवर्गीय विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या ०४ महामंडळांना ३५०० कोटींहुन अधिकचा निधी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आला.या निर्णयाबद्दल सर्वप्रथम राज्य सरकारचे आभार परंतु त्याचबरोबर काँग्रेस मंत्र्यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळ,ओबीसी महामंडळाच्या निधीचे काय ?
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना हवा तेवढा निधी मिळतो परंतु काँग्रेस मंत्र्यांना मिळत नाही,यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की काँग्रेसचे मंत्री श्री.विजय वडेट्टीवार,श्री.सुनील केदार निधी आणण्यात सपशेल अयशस्वी ठरले आहेत.
गेल्या २ वर्षांपासून आम्ही धनगर समाजाच्या योजनांसाठी १ हजार कोटी,ओबीसी-भटकेविमुक्तच्या महामंडळांच्या निधीसाठी संघर्ष करत आहोत परंतु सरकार त्याकडे लक्ष देत नाही.
आमची सरकारकडे मागणी असेल की लवकरात महामंडळांना निधी जाहीर करावा अन्याय संघर्ष अटळ आहे !
– मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे
अध्यक्ष – ओबीसी जनमोर्चा

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!