ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघावतीने आदर्श गुणवंतांचा पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघावतीने आदर्श गुणवंतांचा पुरस्काराने सन्मानित

काम करणाऱ्याना व्यक्तीला पुरस्काराने उर्जा मिळते : विश्वासराव आरोटे

अक्कलकोट /
कोरोना काळात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध ठिकाणी अर्थसहाय्य, धान्य वाटप, पुरग्रस्तांना छत्री व ब्लॉकेट वाटप करण्यात आले. असे अनेक उपक्रम संघाच्या माध्यमातुन केले जाते त्याचाच एक भाग म्हणुन अक्कलकोट येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघावतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या आदर्श व गुणवंता पुरस्काराने सन्मानित केले,काम करणाऱ्याना व्यक्तीला पुरस्काराने उर्जा मिळते असे प्रतिपादन प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी केले.
येथील पंचायात समिती सभागृह येथे आयोजीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई. शाखा – अक्कलकोट व शांभवी फाऊंडेशन, दुधनी यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत व्यक्तीचा तालुकास्तरीय पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या प्रतिमेचे पुजन दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वासराव आरोटे हे होते.
यावेळी व्यासपिठावर श्री वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,वैधकीय अधिक्षक डॉ. अशोक राठोड,डॉ.दिनेश मुरूमकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुंबई उपनगरे प्रमुख डॉ.स्वामी वैदु,
सरपंच वनिता सुरवसे,आसिफ यत्नाळ, संजय फुलसुंदर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांनी केले. याप्रसंगी प्रथमेश म्हेत्रे यांचे विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.तर यावेळी
बोलताना श्री वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे म्हणाले की,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने शांभवी फॉऊडेशनला प्रथमच सोबत घेऊन संयुक्तरित्या कार्यक्रम आयोजित केल्याने भविष्यात
शांभवी फॉऊडेशनचे सहकार्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला नक्कीच मिळेल, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्यामुळे
संघाला उज्वल भविष्य असल्याचे म्हणाले.
या कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, सचिव विश्वनाथ चव्हाण,स्वामीराव गायकवाड राजेशकुमार जगताप,दयानंद दणुरे,
समाधान अहिरे, विश्वनाथ राठोड, रमेश भंडारी,
निंगप्पा निंबाळ,संतोष राठोड, नितिन गायकवाड , रत्नाकर गायकवाड,आदीनी परिश्रम घेतले.
विविध क्षेतातील उल्लेखनिय कार्य केलेल्या मान्यावराचे नाव डॉ.अशोक राठोड पोलिस हवालदार धनराज शिंदे,पोलीस विपीन सुरवसे,पोलीस गजानन शिंदे,डॉ. हेमंत पटवर्धन,डॉ. लिंगराज बोकडे,डॉ. दिनेश मुरूमकर,डॉ. भाग्यश्री बनसोडे,डॉ. मंजुनाथ पाटील,डॉ.शरणप्पा चुंगरेकर, सुरेश कोळी,प्रेमदास पवार,विक्रम घाटे,अभयकुमार निलुरे,दयानंद बिराजदार, शरणबसप्पा पाटील,श्रीराम चव्हाण,
राजकुमार गोब्बुर,शोभा म्हेत्रे,राजेंद्र पवार, रिंकु जाधवर-धस,जावेद पटेल – आदर्श संस्थाचालक राजकुमार काळे,मल्लप्पा कांबळे,शंकर व्हनमाने,डॉ. प्रा.शिवराया आडवितोटे,लता नारायणकर,शरणप्पा फुलारी, रेखा सोनकवडे,पोमु राठोड, मंगल शिवशरण,मारुती हन्नूरे,दिनेश चव्हाण,अविनाश मोरे,राजेंद्र मोहोळकर, वासुदेव देसाई,शिवशरण गोविंदे गणपती दळवाई, नफिसा शेख,वसीमुनीसा शेख,महानंदा आलुरे,महादेवी मुगळी,तुकाराम राठोड,पिरपाशा पिरजादे पाटील,रतनसिंग राठोड,अमृत सोनकांबळे,कमलाकर कांबळे,जय पारखे,दत्ता कांबळे,वसंत देडे,किरण गवंडी,मुनाफ चिरके,शिवाजी लोखंडे,प्रदिप पाटील, शिवपुत्र घटकांबळे,प्रा. परमेश्वर अरबाळे,मल्लिकार्जुन कोरे,वनिता सुरवसे,शिवलाल राठोड,संतोष बनसोडे, राजकुमार सोनकांबळे,दिगंबर सोनकांबळे,श्रीमंत राठोड,यशवंत पाटील,लक्ष्मण सोनकांबळे,प्रकाश उण्णद,संजय (लाला) राठोड या सर्व मान्यवरांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचलन सागर सोनकांबळे व विश्वनाथ चव्हाण यांनी केले आभार स्वामीराव गायकवाड यांनी मानले

ashish more

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे श्री आशिष भालचंद्र मोरे है असून ते माहीती अधिकार व प्रञकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे मुबंई शहर अध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(मुबंई न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!